
व्हॉटसअप वरील स्टेटस मुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल
विशाळगडावरील अतिक्रमण हटविल्यानंतर व्हॉटसअपवर विविध स्टेटसचे पेव फुटले आहे. यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याची तक्रार मुस्लीम समाजाच्यावतीने दापोली पोलीस स्थानकात दापोली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्याकडे करण्यात आली.या तक्रारीत म्हटले आहे की, कोल्हापूर येथील विशाळगडावरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी हटविण्यात आले. यानंतर व्हॉटसअपवर विविध स्टेटस ठेवण्यात आले. यामध्ये मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारे स्टेटस ठेवण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी दापोलीतील फॅमिली माळ येथील एका मुस्लीम युवकाने बाबरी मशिदीचे स्टेटस ठेवल्यामुळे दापोलीत मोठा गोंधळ उडाला होता. त्या युवकाला जाहीर माफी मागायला लागली होती. शिवाय त्या युवकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.www.konkantoday.com