परशुराम घाट येथे झालेल्या एस टी बस व दुचाकी अपघातामध्ये दोघेजण जखमी
एस.टी. बसगाडी व दुचाकी यांच्यात अपघात होवून दोघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास परशुराम घाट येथे घडली. या प्रकरणी एस.टी. चालकावर चिपळूण पोलीस स्थानकात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र पंढरीनाथ शिरसाठ (कळवण, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तसेच जयंत काशिराम मेटकर (२४), हर्ष परशुराम मेटकर (१७, दोघे रा. परशुराम) हे या अपघातात जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद प्रितेश प्रकाश शिंदे (चिपळूण पोलीस स्थानक) यांनी दिली आहे.www.konkantoday.com