
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठेंगा दाखविल्याची विरोधकांकडून टीका
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला झुकते माप दिले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण फार राज्याच्या वाट्याला विशेष असे काहीच आलेले नाही.महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका विरोधकांनी केली आहे.महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्याबद्दल भाजपचे नेते नेहमी पाठ थोपटून घेतात. पण केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठेंगा दाखविल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून वसूल होत असताना राज्याला अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळालेले नाही. सरकार टिकविण्यासाठी आंध्र प्रदेश आणि बिहारवर निधीची खैरात करण्यात आली आहे. राज्याच्या वाट्याला काहीच आलेले नाही, अशी टीकाही व़़डेट्टीवार यांनी केली.