रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी होणारा कचरा आता ‘ट्रॅक्टर पूल बीच टेक’ यंत्राद्वारे गोळा करण्यात येणार
*रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी होणारा कचरा आता जर्मन टेक्नॉलॉजीने बनविलेल्या ‘ट्रॅक्टर पूल बीच टेक’ यंत्राद्वारे गोळा करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे समुद्र किनारे चकाचक होणार आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनारे हे स्वच्छ ठेवणे स्थानिक प्रशासन, तसेच जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असते. समुद्र किनारे स्वच्छ असतील तर पर्यटकांचा ओढा अधिक वाढून अर्थकारणही वाढत असते. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाने राज्यातील, तसेच जिल्ह्यातील समुद्र किनारे हे परदेशातील समुद्र किनार्याप्रमाणे स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी विकसित झालेल्या नव्या तंत्रज्ञानाच वापर केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे सामाजिक दायित्यमधून जिल्ह्यातील समुद्रकिनारे स्वच्छता करण्यासाठी चार ट्रॅक्टर पूल बीच टेक मशीन आणल्या आहेत.