आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस घरी बसतील व त्यानंतर पुन्हा प्रसाद लाड हे दुसऱ्या तंबूत जातील-माजी खासदार विनायक राऊत
महायुती व महाविकास आघाडी मधील नेत्यांमधील धुसफूस काही केल्या कमी होताना सध्या दिसत नाही. अक्कलकोट येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर अनेक पक्षातून बाडगेगिरी करणारा नेता असा उल्लेख करत जहरी टीका केली.यावेळी विनायक राऊत यांनी टीका करताना प्रसाद लाड हे काही सच्चे भाजपवासी नाहीत. ते अनेक पक्षातून बाडगेगिरी करत सध्या भाजपत असे राऊत म्हणाले. त्यांच्याकडे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळी उचलण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस घरी बसतील व त्यानंतर पुन्हा प्रसाद लाड हे दुसऱ्या तंबूत जातील, अशी खोचक टीका यावेळी केली. आता लाड हे केवळ व्यापारी वृत्तीने तयार झालेले भाजपतील नेते आहेत असेही त्यांनी सांगितले.