दापोली तालुक्यातील कर्दे येथे घराला लागलेल्या आगीत घर झाले बेचिराख
दापोली तालुक्यातील कर्दे गावात घराला आग लागून ६ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झालं आहे. सुदैवाने याठिकाणी जीवितहानी झाली नाही. दापोली तालुक्यातील कर्दे गावातील खैराचा कोंड येथील जनार्दन महादेव पेवेकर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून घर जळून खाक झाले.काल शनिवार दिनांक दुपारी २:३० च्या सुमारास स्वतः जनार्दन पेवेकर व त्यांची पत्नी आणि मुलगा बागेत कामासाठी गेले होते. तोच थोड्याच वेळात घरातून धूर येताना दिसला म्हणून पेवेकर यांच्या पुतणीने त्यांना काका घरातून धूर येत आहे तुम्ही लवकर घरी या. आम्ही तसेच बागेतून घरी गेलो मी तातडीने वायरमनना फोन करून कळवले त्यांनी लगेच लाईट बंद केला. अशी माहिती घरमालक जनार्दन पेवेकर यांनी दिली. घराला आग लागलेली कळताच कर्दे मुरुड आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु घराला वरील बाजूस सुख लाकूड समान तसेच आतील सगळं सुख समान असल्याने पटापट या आगीने रौद्ररूप धारण करून ज्या खोलीमध्ये आग लागलेली तेथील सर्व सामान भस्मसात केलं. दापोलीत बंब नसल्याने गावातील लोकांनी पंपाच्या साहाय्याने तसेच इतर साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत घर जळून खाक झाले होते. घटनेची खबर तलाठी आदित्य हिरेमठ याना कळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन पाहणी करून पंचनामा केला या पंचनाम्याअंती सदर पेवेकर यांचे या घटनेमध्ये ६ लाख २८ हजार इतके रुपयांचे नुकसान झाले आहे.