खेड तालुक्यातील फुरूस येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बजावली नोटीस.
खेड तालुक्यातील फुरूस परिसरात डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळत असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रूग्णांची हेळसांड होत असल्याचा सूर ग्रामस्थांकडून आळवण्यात येत होता. तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांनी दोन्ही वैद्यकीय अधिकार्यांना शुक्रवारी रितसर नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.फुरूस परिसरात डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळून येत आहेत. याठिकाणी उपचारासाठी येणार्या रूग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याची ओरड देखील सुरू आहे. www.konkantoday.com