
ओंकार पतसंस्थेला आर्थिक नुकसान झाल्याने तत्कालीन व्यवस्थापक व संचालक यांना प्राधिकृत चौकशी अधिकारी अविनाश इंगळे यांनी दिली नोटीस
देवरूख येथील ओंकार पतसंस्था आर्थिक अरिष्टात सापडली असून कारभार अडचणीत आला. आता तत्कालीन व्यवस्थापक आणि संचालकांची चौकशी सहकार खात्याने लावली असून जवळपास ३० लोकांना या चौकशीसाठी बोलावले आहे. झालेल्या व्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार खात्याने हे पाऊल उचलले आहे.ओंकार पतसंस्थेला आर्थिक नुकसान झाल्याने तत्कालीन व्यवस्थापक व संचालक यांना प्राधिकृत चौकशी अधिकारी अविनाश इंगळे यांनी नोटीस दिली आहे. कागदोपत्री सविस्तर खुलासा द्यावा, असे फर्मावण्यात आले आहे. ही नोटीस तत्कालीन व्यवस्थापिका वासंती अनिल निकम, प्रभारी व्यवस्थापिका मनाली मंदार मांगले, कॅशियर जान्हवी श्रीनिवास मुळ्ये, लिपिक संगीता नीलेश कुलकर्णी यांना जारी झाल्या आहेत. याशिवाय ५ जुलै २०१२ पर्यंत कार्यरत असलेल्या संचालकांनाही नोटीसा काढल्या आहेत. रश्मी रमेश सप्रे, गजानन केशव जोशी, मुकुंद नरहर जोशी, अनिल श्रीधर राजवाडे, नितीन सुधाकर पुरोहित, शंकर लक्ष्मण शेट्ये, रघुनाथ विठ्ठल कानिटकर, सुनिल विठ्ठलराव खेडेकर, अनिता अनंत किर्वे, जयश्री रघुनाथ कानिटकर, मधुरा रमेश केळकर, विकास प्रभाकरराव शृंगारे, संदीप कृष्णकांत कारेकर, वसंत नरहर केतकर, राजाराम रामचंद्र जोशी यांचा नोटीसा काढलेल्या लोकांमध्ये समावेश आहे. www.konkantoday.com