
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गणपतीपुळे येथे जबाबदार पर्यटन उपक्रम
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथील पर्यटक निवासात प्रायोगिक तत्वावर जबाबदार पर्यटन उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. कार्बन कुटप्रिंट कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की, यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प गणपतीपुळे येथे राबवण्यात येईल. येथील पर्यटक निवासात चव आणि खाद्य संरक्षक रसायन आणि कृत्रिम वास येणारी द्रव्ये यांना बंदी घालण्यात येईल. उत्पादने पर्यटकांसाठी सादर करण्यात येतील. हा परिसर फ्लेक्शविरहीत ठेवण्यात येईल. प्लास्टीकच्या बाटल्यासुद्धा न देण्याचे ठरवण्यात आले आहे.पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी सांगितले की, पर्यटकांनी सांगितल्याशिवाय आम्ही पलंगपोस बदलणार नाही. कचरा व्यवस्थापन त्याचबरोबर अन्नाचे प्रमाणबद्ध व्यवस्थापन, पाण्याच्या वापरात बचत त्याचबरोबर वातानुकुलित यंत्रांची २४ डिग्री सेंटीग्रेडसाठी देखभाल अशी व्यवस्था ठेवण्यात येईल.कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. सध्या ती २.०५७ पासून ०.८५८ किलो प्रती पर्यटक कार्बन डायऑक्साईड एवढे आली आहे आम्ही ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म तयार केला आहे. आणि पर्यटक निवसातील सर्व माहिती एकत्र करण्यात येत आहे. तेथे ५४० पाहुण्यांची व्यवस्था होत आहे. कार्बन फुटप्रिंट मोजमापाची व्यवस्था गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे करण्यात आली आहे. www.konkantoday.com