चिपळूण पोस्टात पासपोर्ट कार्यालय ताबडतोब चालू करा -शौकतभाई मुकादम यांची मागणी
*_चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. चिपळूण पोस्ट कार्यालयामध्ये पासपोर्टचे कार्यालय सुरू करावे अशी आमची अनेक वर्षापासूनची मागणी असून चिपळूणमध्ये या कार्यालयासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जागाही उपलब्ध आहे. असे आम्ही केंद्रीय परिवहन मंत्रालयाला कळविले आहे. सध्या राजापूर येथे पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू आहे. त्याला आमचा विरोध नाही परंतु मंडणगड पासून राजापूरला पासपोर्टच्या कामांसाठी जाणे अवघड आहे. चिपळूणमध्ये पासपोर्ट कार्यालय तातडीने सुरू करावे म्हणजे पासपोर्ट काढणार्या नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी चिपळूणचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. www.konkantoday.com