खेड तालुक्यातील मौजे तिसंगी बर्गेवाडी येथे महावितरणच्या तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने गुराखी आणि त्याच्या गायीचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात सुमारे १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद खेड तालुक्यात झाली आहे. खेड तालुक्यातील मौजे तिसंगी बर्गेवाडी येथे आज (शुक्रवार) एक दुर्दैवी घटना घडली.महावितरणच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने गुराखी आणि त्याच्या गायीचा मृत्यू झाला.महावितरणच्या पोलवरील वायर तुटून खाली पडलेली असताना एक गुराखी व तिच्या गाईला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच खेडचे सहायक पोलिस निरीक्षक नावले, पोलिस उपनिरीक्षक केंद्रे घटनास्थळी रवाना झाले