रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष पदी पालकमंत्री उदय सामंत यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी जिल्ह्याची कबड्डीअसोसिएशनची जनरल सभा आज चिपळूण येथील अतिथी ग्रँड हॉटेल येथे संपन्न झाली या सभेला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली होती.यावेळी कबड्डी दिनाच्या पूर्वसंधेला रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष पदी पालकमंत्री उदय सामंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जनलर सभेला नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी संबोधित केले. ते यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व हेवेदावे बाजूला ठेवून आपण मला रत्नागिरी जिल्हा कबड्डीअसोसिएशनच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्व सभासदाचे आभार मानतो.यांचा पश्चाताप कुणाला होणार नाही याची अध्यक्ष म्हणून मी काळजी घेणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. या पुढे कबड्डी खेळाडूंचे मन दुखवणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या. महाराष्ट्रचे काम करणाऱ्यां सर्व पक्ष जनरल सभेला सर्व पक्ष बाजूला ठेवून एकत्र आले हाच आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कबड्डी मध्ये कबड्डी खेळणाऱ्याना मोठे करण्याची जबाबदारी आपली आहे. जे खेळाडू जिल्ह्यात घेतील आणि आपले मेरिट दाखवतील त्याच्यावर अन्याय होणार नसल्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून मी स्वीकारत आहे. सगळ्यांना सोबत घेऊन यां कबड्डीला असलेल्या दिवसा पेक्षा चांगले दिवस येतील असा शब्द उदय सामंत यांनी दिला. मी ही खेळाडू असून सेंटर लाईन व बोनस कसा घ्यायचा हे मला चांगले माहित आहे. यापुढे कबड्डीला मोठा करणे हेच माझे मिशन असून त्यासाठी मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगलं काम करेन असे आश्वासन सर्व उपस्थितीताना दिले.
रत्नागिरी जिल्हा कार्यकरणी मध्ये कार्यध्यक्ष मंगेश तांबे (चिपळूण),उपाध्यक्ष मंगेश मोरे (दापोली ),संतोष दामुष्टे (देवरुख)
उमेश सकपाल (चिपळूण), सतिश चिकने (खेड), नेत्रा राजे शिर्के (रत्नागिरी), प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे, (दापोली)सहकार्यवाह (पंच प्रमुख)सुधीर सावंत, विकास पवार(चिपळूण), सागर मोरे (गुहागर), संपदा गुजराती (खेड)खजिनदार अभिजित सप्रे (देवरुख) यांची सर्वानुमते जिल्हा कार्यकरणी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम,माजी आमदार रमेश कदम,जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम,रवींद्र देसाई, सदानंद जोशी,मंगेश मोरे,मंगेश तांबे, उमेश सकपाळ, सदानंद जोशी तसेच जिल्ह्यातील सर्व सभासद उपस्थित होते.