सात राज्यांतील १३ पैकी १० जागांवर INDIA आघाडीचे उमेदवार आघाडीवर

७ राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीच्या १३ जागांसाठी (Assembly Bypoll results) आज शनिवारी मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आम आदमी पक्षाने पंजाबच्या जालंधर पश्चिमेची जागा जिंकली आहे. येथून आपचे मोहिंदर भगत विजय झाले आहेत. त्यांनी भाजपचे शीतल अंगुराल यांचा सुमारे ३७ हजार मतांनी पराभव केला. दरम्यान, सात राज्यांतील १३ पैकी १० जागांवर INDIA आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी इंडिया आघाडीने विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला कडी टक्कर दिली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.दरम्यान, विधानसभेच्या उर्वरित १२ जागांपैकी काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल ४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि डीएमके प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. बिहारच्या रुपौली जागेवर अपक्ष उमेदवार शंकर सिंह आघाडीवर आहेत. येथे जेडीयूचा उमेदवार पिछाडीवर आहे.पोटनिवडणुकीच्या १३ जागांमध्ये बिहारमधील रुपौली, हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमीरपूर, नालागढ, मध्य प्रदेशातील अमरवाडा, पंजाबमधील जालधंर पश्चिम, तामिळनाडूतील विक्रवंडी, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला यांचा समावेश आहे.*हिमाचलमध्ये काॅंग्रेसला यश*राज्यसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत तीन अपक्ष आमदारांनी राजीनामा दिला होता. यामुळे हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या तीन जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने पक्षाने या जागेवरुन मैदानात उतरवले. काँग्रेसने देहरा येथून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्या येथून विजयी झाल्या आहेत.https://chat.whatsapp.com/D0qmBYgQjexITqlUby8o9U

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button