
योजनेचे ऍप चालेना रूसले.. लाडकी बहीण योजना पुढे सरकेना
राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेत अर्ज भरताना अंगणवाडी सेविकेवर ताण येत आहे. या योजनेचे ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. या सेविकांना आणि बालविकास विभागाकडून दररोज ३० अर्ज अपलोड करण्याची ताकीद देण्यात आली आहे. मात्र नारीशक्ती दूत ऍपला येत असलेल्या व्यत्ययामुळे प्रत्यात १० पेक्षाही कमी अर्ज भरले जात आहेत. अशातच अंगणवाडीचे काम सांभाळून या महिलांना अर्ज भरणे आता खूपच कठीण होत आहे.www.konkantoday.com