
राजापूर तालुक्यातील सोलगाव परिसरात बिबट्या आढळला मृतावस्थेत
राजापूर तालुक्यातील सोलगाव, देवीची गुरववाडी येथील वसंत नारायण गुरव यांच्या घराच्या बाहेरील भागामध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. सदर बिबट्याचा भूकेने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलगाव देवीची गुरववाडी येथील वसंत गुरव हे मुंबईला वास्तव्यास असून त्यांचे घर बंदस्थितीत असते. बुधवारी दुपारी गुरव यांच्या घराशेजारी बिबट्या असल्याची शेजारी राहणार्या ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ याबाबत वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच भूकेने बिबट्या मृत झाल्याचा अंदाजही वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, रत्नागिरी लेखापाल तानाजी पाटील, राजापूर वनरक्षक विक्रम कुमार यांच्यासह अनिकेत मोरे, नितेश गुरव यादी उपस्थित होते www.konkantoday.com