रत्नागिरी नगर परिषदेची शहरातील डॉ. बा. ना. सावंत रोड येथील नवीन भाजीमार्केटवरील कारवाईवेळी गाळेधारकांची धावपळ
रत्नागिरी नगर परिषदेची शहरातील डॉ. बा. ना. सावंत रोड येथील अतिधोकादायक बनलेल्या नवीन भाजी मार्केट इमारतीमधील आतील, बाहेरील सर्व गाळेधारकांना गाळे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तरीही अजून त्यांचे त्या इमारतीत ठाण मांडलेले आहे. त्यामुळे गुरूवारी न.प. प्रशासनामार्फत कारवाईचे पाऊल उचलण्यात आल्याने गाळेधारकांची धावपळ उडाली. पण येत्या मंगळवार १५ जुलैपर्यंत गाळे खाली करण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच पुढील कारवाई केली जाणार आहे.नगर परिषदेच्या नगररचनाकार विभागाने पावसामध्ये धोकादायक बनलेल्या शहरातील ७१ इमलेधारकांना यापूर्वीच नोटीस बजावली आहे. अतिधोकादायक इमले पाडून सुरक्षित ठिकाणी जावे किंवा तत्काळ दुरूस्ती करावी, असे नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे. परंतु शहरात नवीन भाजीमार्केटची इमारत अतिधोकादायक आहे. ती वगळता एकही इमारत अतिधोकादायक नसल्याचे या विभागाने सांगितले. रत्नागिरी न.प. आणि नगररचना विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात काही धोकादायक इमारतींची माहिती पुढे आली. या बाबत नगररचना विभागाने नगर परिषदेला अवगत करून धोकादायक दमारत मालकांना तत्काळ नोटीसा बजावल्या होत्या. पावसाळ्यातील खबरदारी म्हणून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शहरातील त्या ७१ इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार मालकांना अतिधोकादायक इमारत असल्यास ती रिकामी करावी असे नोटीसीत म्हटले आहे. तर ज्या इमारती धोकादायक इमारत असल्यास ती रिकामी करावी, असे नोटीसीत म्हटले आहे तर ज्या इमारती धोकादायक आहेत, परंतु त्यांची दुरूस्ती अनिवार्य आहे अशा इमारती दुरूस्त करण्यास सांगण्यात आले. www.konkantoday.com