
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ५ वर्षात मोकाट गुरांमुळे २१ अपघात, सात जणांचा मृत्यू
पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून जिल्ह्यात गेल्या पाच वर्षामध्ये जनावरांमुळे २१ अपघात होवून ७ जणांचा मृत्यू झाला तर ५ जनावरे दगावली असून ८ जखमी झाली. त्यात मोकाट गुरांचा प्रश्न अजूनही भिजत पडला आहे. मोकाट गुरांची चोरी, बेकायदेशीर वाहतूक, हे रोखण्यासाठी अशा गुरांच्या संरक्षण आणि संगोपनाच्यादृष्टीने विचार होण्याची गरज आहे.गोवंश हत्या झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. वासराचे मुंडके रस्त्यावर सापडल्यानंतर समाजाच्या भावना दुखवल्याने हिंदू समाज आणि गोरक्षक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. अतिशय गंभीर आणि क्रूर हा प्रकार आहे. त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. त्याला अटक करून कडक कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात असे प्रकार होणार नाही, यासाठी पोलीस दलाने खबरदारी घ्यावी, या मागणीसाठी समाज रस्त्यावर उतरला. मोर्चा काढून मोर्चेकर्यांनी रास्तारोको केले.या दरम्यान पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्याच्या वेतोशी येथील जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकून ८ गुरांची सुटका करण्यात आली. याबाबत त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झाला.www.konkantoday.com