महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयानजिक एक भला मोठा अजगर फिरताना आढळला
चिपळूण शहरातील शिवनदी पुलावर दहा फुटी मगर मुक्त संचार करण्याची घटना ताजी असतानाच महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयानजिक एक भला मोठा अजगर रात्री फिरतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या अजगराला सुखरूप पकडून सर्पमित्रांनी वन विभागाच्या ताब्यात दिले. या वेळी महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डीबीजे महाविद्यालयानजिक असलेल्या सर्व्हिस रोडवर रविवारी रात्री हा भला मोठा अजगर पहायला मिळाला. हा अजगर पाहताच अनेक वाहनचालक रस्त्यावरच थांबले. यावेळी तत्काळ सर्पमित्रांना बोलाविण्यात आले. यावेळी तो अजगर महामार्गावरील गटाराच्या आत शिरण्याचा प्रयत्न करीत होता. सर्पमित्रांनी त्याला सुखरूप बाहेर काढत वन विभागाच्या ताब्यात दिले. रात्री या अजगरास पाहण्यासाठी नागरिकांसह वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. www.konkantoday.com