चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे अनधिकृत भंगार गोदामामुळे पावसाचे पाणी थेट लोकवस्तीत
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील समर्थनगरमध्ये चिपळूण-कराड महामार्गालगत उभारलेल्या अनधिकृत भंगाराच्या गोदामामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. याबाबत येथील रहिवाशांनी सातत्याने चार वर्षापासून प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यानुसार प्रशासनाने ते बांधकाम तोडण्याचे आदेशही दिले, त्यानंतरही गोदाम जैसे थे राहिले. परिणामी यावर्षीदेखील येथील रविवाशांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिपळूण-कराड मार्गावर पिंपळी खुर्द थेयील समर्थ नगरमधील जगदीश गंदुलकर यांनी आफताब अब्दुल सत्तार कच्छी यांनी बांधलेल्या अनधिकृत भंगार गोदामाची तक्रार केली होती. त्यांनी पिंपळी खुर्द ग्रामपंचायत, चिपळूण पंचायत समिती, तहसिलदार चिपळूण यांच्याकडेही लेखी निवेदन देत समस्या मांडली. या गोदामास ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी दिलेली नाही. पावसाळ्यात येथील घरांकडे जाणार्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचू राहते. पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी येथील वयोवृद्धांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात येथील पाण्याचा निचरा होत नसल्याने इंदुलकर यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली. त्यानुसार भंगार गोदामाची सविस्तर चौकशी झाली. कारवाई होत नसल्याने इंदुलकर यांनी महाराष्ट्र राज्य मानव एकाधिकार समितीकडे धाव घेतली. त्यानुसार या समिनीने प्रशासकीय यंत्रणेला त्वरित कारवाईच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे तहसिलदारांनी गोदाम मालकास स्वखर्चाने बांधकाम पाडण्याच्या सूचना तीन महिन्यापूर्वीच दिल्या होत्या.www.konkantoday.com