रत्नागिरीकरांसाठी निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम
रत्नागिरी शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी येथे निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.हा अभ्यासक्रम २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२४ या एक महिन्याच्या कालावधीत सायंकाळी ५ ते ६ या वेळेत घेतला जाणार आहे.कामाच्या व्यस्ततेतून जरा वेळ आरोग्यासाठी रत्नागिरीकरांना देण्याची ही सुवर्णसंधी आहे. हा अभ्यासक्रम अरिहंत मॉल येथील रत्नागिरी उपकेंद्रात होणार आहे.ह्या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योग प्रकारांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे.शिवाय हा अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.