मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करीत आहात तर मग हे वाचा !महामार्ग तीन दिवस चार तास वाहतुकीला बंद राहणार

मुंबई गोवा महामार्गावरून आपण आता प्रवास करणार असाल तर इथे लक्ष द्या मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यामुळे हा मार्ग त्या काळात वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद राहणार आहे कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिसूचना जारी केली आहे.११ जुलै ते १३ जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.गेल्या १२ वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पूलाचे गर्डर टाकण्याचे काम ११ ते १३ जुलै दरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आणण्यात आले आहेत. गर्डर बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीही पूलाजवळ दाखल झाल्या आहेत. हे काम करतांना वाहतुक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतुक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवणेबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतुक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना मंगळवारी रात्री उशीरा जारी केली आहे.*पर्यायी मार्ग*वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येणार आहे. वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येणार आहे. या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button