ग्रॅव्हीटी पाणी योजना हा माझा संकल्प, विरोधक उगाचच श्रेय घेत आहेत माजी आमदार रमेशभाई कदम
निवडणुका तोंडावर असल्यानेच विरोधकांना आता शहराची ग्रॅव्हीटी पाणी योजना आठवली आहे. या योजनेच्या तांत्रिक मंजुरीवरून आज फुकटचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत चढाओढ सुरू आहे. ज्यांचा अभ्यास नाही, ते देखील वृत्तपत्र, जाहिरातबाजीतून आपल्या मंत्र्यांची टिमकी वाजवित आहेत. ही योजना आपल्या नेत्या, मंत्र्यांमुळेच मार्गी लागल्याचा कांगावा करीत आहेत. मात्र एकदा त्यांनी अभ्यास करावा, म्हणजे कळेल ही योजना खर्या अर्थाने शहरात कोणी आणली? २००४ साली मी आमदार असताना शहराला शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रॅव्हीटी पाणी योजनेचा संकल्प सोडला. त्यासाठी पाठपुरावा केला. दिल्ली, नागपूर, मंत्रालयात या योजनेसाठी जवळपास पंधरा ते वीस वेळा बैठका झाल्या. ही योजना शहरासाठी किती महत्वाची आहे हे शासनाला पटवून दिले. त्यानंतरच शासनाने या योजनेला मंजुरी दिली आणि आमच्या प्रयत्नांना यश आले. केवळ यशच आले नाही तर पाणी देण्याचा जो करारनामा करावा लागतो तो सुद्ध नगर पालिकेच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही शासनाकडे केला, अशी माहिती देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी आमदार रमेशभाई कदम यांनी आमदार शेखर निकम व बाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे यांना टोला लगावला.www.konkantoday.com