
कोकण रेल्वे अजूनही ठप्प ,पेडणे बोगद्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी 100 कर्मचारी 25 अधिकारी व तज्ञांचे पथक कार्यरत-संतोष कुमार झा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,कोकण रेल्वे
कोकण रेल्वे महामार्गावर पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वेची संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या थांबवण्यात आले आहेत तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहेत याबाबत आता संतोष कुमार झाअध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,कोकण रेल्वे यांनी माहिती दिली आहे बोगद्यातील जमिनीतून पाणी येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी कोकण रेल्वेचे 100 कर्मचारी 25 सुपरवायझर व तज्ञ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे याशिवाय आंतरराष्ट्रीय तज्ञ त्या ठिकाणी पोहोचत आहेत जमिनीतून येणारे पाणी थांबवण्यात आपल्याला आज सायंकाळपर्यंत सात-आठ वाजेपर्यंत यश येईल असे झा यांनी म्हटले आहे यामुळे आता यानंतरच कोकण रेल्वेचे वाहतूक सुरू होण्याबाबत निर्णय होणार आहे