उन्हवरे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसल्याने १२ लाख ९० हजारांचे नुकसान

रविवारी ७ तारखेच्या संध्याकाळी अचानक पावसाने जोर धरला व धो धो कोसळला. सुमारे ५ तास रात्रभर झालेल्या अतीवृष्टीमुळे उन्हवरे व फरारे गावातील रहिवाशांना चांगलाच फटका बसून यामध्ये सुमारे १२ लाख ९० हजारांचे नुकसान झाले आहे.मुसळधार पडणार्‍या या पावसाने उन्हरे खाडीला पूर आला व काही वेळातच रात्री ९ च्या सुमारास पुराचे पाणी भरती असल्याने हा हा म्हणता घरात व दुकानात घुसले. त्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर पर्यटन क दर्जा प्राप्त असलेल्या उन्हवरे गरम पाणी कुंडानाही पुराच्या पाण्याचा फटका बसून दुरवस्था झाली आहे. घरामध्ये व दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button