
याला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं” नितेश राणे यांची बोचरी टीका
अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा थाटामाटात पार पडला.या सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. अगदी जस्टिन बीबर, सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या पासून ते राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींपर्यत अनेकांनी सोहळ्यात आपली प्रमुख उपस्थिती लावली. संगीत कार्यक्रमात अनेकांनी नृत्य केले पण चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवाची.. यावरच आता सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. अश्यातच नितेश राणेंनी देखील आता तेजस ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.काही दिवसांपूर्वी बी.के.सी.येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इथे संगीतसोहळा पार पडला.त्या संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले. या संपूर्ण सोहळ्यात तेजस ठाकरे यांनी देखील नृत्य केल्याचं दिसून आलं. तेजस ठाकरे यांनी केलेल्या नृत्याचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होताच विरोधकांनी त्यांना टीकेचे धनी केले आहे. यावेळी बोलत असताना नितेश राणे म्हणले आहेत की, “रोहित पवार यांनी ड्रायव्हरची नोकरी सोडावी. अडीच वर्ष समृद्धी महामार्ग बाबत गप्प का होते?. पवार यांचा नातू आदानींचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ड्रायव्हर दुसरा नातू नाच्या परत गुजरात्यांना शिव्या घालायच्या. याला आता नाच्या ठाकरे नाव द्यावं” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.