धोपेश्वर गावातील वरचे बारसू येथे स्मशानभूमीत जाणाऱ्या वाटेवरील वहाळावर साकव नसल्याने पावसाळयात अंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय
राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर गावातील वरचे बारसू येथे स्मशानभूमीत जाणाऱ्या वाटेवरील वहाळावर साकव नसल्याने पावसाळयात अंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय होत आहे. या वहाळावर तात्काळ साकव बांधवा अशी मागणी असूनही व ग्रामपंचायतीने त्याबाबत ठराव करून लेखी निवदने दिलेली असूनही प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बारसू ग्रामस्थांनी केला आहे.या बाबत आता पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांना निवेदन दिले असून या ठिकाणी तातडीने साकव व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.धोपेश्वर गावातील वरचे बारसू येथे स्मशानभूमीत जाणाऱ्या वाटेवरील वहाळावर साकव नसल्याने पावसाळयातअंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय होत आहे. पावसाळयात या वहाळात मोठय प्रमाणावर पाणी येते. उन्हाळयात पाणी नसल्याने या वहाळातुन ये जा करता येते, मात्र पावसाळ्याच्या चार महिन्यात स्मशानभूमीत जाणे-येणे फारच कठीण व अडचणीचे होते. या कालावधीत गावात प्रेत झाले तर या वहाळातून अंत्ययात्रा नेणे हे कायमच अडचणीचे होत आहे.