कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे मागणीसाठी १५ ऑगस्टपूर्वी वकील परिषद
कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी खंडपीठ कृती समितीच्यावतीने १५ ऑगस्टपूर्वी कोल्हापुरात वकील परिषद घेण्याबाबत शनिवारी रात्री झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्धार करण्यात आला. बैठकीला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीला कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील ६४ तालुक्यातील विविध बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सभागृहात झाली.www.konkantoday.com