
दापोली तालुक्यातील सातांबा गावातील १९ वर्षाचा मुलगा खेम धरणात बुडाला
दापोली तालुक्यातील सातांबा गावातील १९ वर्षाचा मुलगा खेम धरणात बुडाला असल्याची माहिती दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली आहे. कल्पेश बटावळे (वय १९) असे या युवकाचे नाव आहे.सातांबा गावातील ४ युवक रविवारी (दि ७) दापोली येथे आली होती. ही चारही मुले हर्णे येथील खेम धरणावर अंघोळीसाठी आली होती. धरणात अंघोळीसाठी उतरली असता त्यातील कल्पेश बटावळे हा युवक पाण्यात बुडाला. त्यातील इतर तीन मुले सुखरूप आहेत. दापोलीतील पोलीस यंत्रणेकडून या मुलाचा शोध सुरू आहे.