मुसळधार पावसामुळे राजापुरात पुराची स्थिती
शनिवारी सायंकाळपासून राजापूर शहर आणि तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.राजापूर तालुक्यात रविवारी एकुण ७३४ मिमी तर सरासरी ९१.७५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर एकुण १०४६.४२ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठीकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे. www.konkantoday.com