
आशा मधुसूदन पाटील यांचे दुःखद निधन
रत्नागिरी कुवारबाव येथील प्रसिध्द डॉक्टर अनिल पाटील यांच्या मातोश्री आशा मधुसूदन पाटील यांचे काल 06/07/2024 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी दुःखद निधन झालं. आपल्या मृत्यू नंतर आपलं देहदान करण्यात यावं अशी इच्छा त्यांनी आपल्या कुटुंबाकडे व्यक्त केली होती व त्यांनी देहादानाचा फॉर्म देखील भरला होता. देहदान, अवयव दान करणे आज काळाची गरज आहे. ज्या कोणाला अवयवदान, देहदान करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांशी यासंबंधी संवाद साधण अत्यंत महत्त्वाचं आहे. पाटील कुटुंबीयांनी डेरवण येथील वैद्यकीय महाविद्यालयात श्रीमती आशा मधुसूदन पाटील यांचा मृतदेह सुपूर्द केला. या दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबीयांनी जे धैर्य दाखवल व आपल्या आईची अंतिम इच्छा पूर्ण केली त्याबद्दल पाटील कुटुंबीयांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.आम्ही पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत 🙏 वल्लभ विभावरी वसंत वणजु.रत्नागिरी. कार्यकर्ता- अवयवदान व देहदान महासंघ मुंबई. पुरुषोत्तम पवार, वसई हे या महासंघाचे अध्यक्ष आहेत.