आठव्या ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा व गोवा संघ विजेते

  • डेरवण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकत्याच अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या वतीने आठव्या ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात पार पडली.या स्पर्धेत भारतातील २१ राज्यातून १८ मुलांचे व २० मुलींचे संघ अशा एकूण ६२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.आर. एच. देशपांडे यांच्या हस्ते लगोरी फोडून करण्यात आले. यावेळी लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीप गुरव, एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, लगोरी संघटनेचे पदाधिकारी अॅड. प्रिया गुरव, तुषार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. तसेच सहभागी राज्यातील संघांनी संचलन करून मान्यवरांनामानवंदना दिली व खेळाडूंनी शपथ घेऊन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.स्पर्धेत मुलांच्या गटात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात गोवा संघाने विजेतेपद पटकावले तर महाराष्ट्र संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला. बिहार व झारखंड संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार हरियाणा मधील अमन कुमार या खेळाडूला देऊन गौरविण्यात आले.मुलींमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये हरियाणा संघ सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपदाचा मानकरी संघ ठरला तर उपविजेतेपद गोवा संघाने मिळविले. तसेच तृतीय स्थान बिहार व उत्तराखंड संघाने पटकावले. मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बिहार मधील काजल या खेळाडूला गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button