राजापूर विधानसभा मतदार संघ कॉंग्रेसला देण्यात यावा, तालुका कॉंग्रेसच्या बैठकीत मागणी
राजापूर तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदार संघामध्ये कॉंग्रेसचे कार्य असून विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपामध्ये हा विधानसभा मतदार संघ मिळावा असा एकमुखी ठराव तालुका कॉंग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये करण्यात आला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी झालेल्या बैठकीत तालुका संपर्क कार्यालय भविष्यात कॉंग्रेस व सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग निश्चित होईल, अशा भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या व्यतिरिक्त आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस मजबूत असल्याने महाविकास आघडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावा, अशी जोरदार मागणी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केली. शिवाय तसा ठराव देखील मंजूर करण्यात आला. www.konkantoday.com