निसर्गसंपन्न रघुवीर घाटाकडे पर्यटकांची पावले वळू लागली

रघुवीर घाटात कोसळणार्‍या जलधारा कवेत घेत चिंब-चिंब भिजण्याचा आनंद देणारा अन हिरवा शालू पांघरलेला रघुवीर घाट पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच दुवा ठरत आहे. फेसाळत कोसळणार्‍या नैसर्गिक धबधब्याखाली भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासह सह्याद्रीच्या मस्तकावर पांघरलेला हिरवा शालू पाहण्यासाठी पर्यटकांची पावले रघुवीर घाटाकडे वळत आहेत. यंदा रघुवीर घाटात ७ कोटी रुपयांचा निधी खर्चून बांधण्ययात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे दरडी कोसळण्याचा धोका काहीअंशी टळल्याने विकेंडला घाटात गर्दी उसळत आहे.तालुक्यातील खोपी या गावातून शिंदी, सातारा या विभागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणजे रघुवीर घाट कड्या कपार्‍या कोरून घाटाची निर्मिती झाल्यानंतर हा घाट पर्यटकांसाठी वरदान ठरू लागला. रत्नागिरी व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या घाटाकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग निर्माण झाल्यापासून रघुवीर घाट सार्‍यांनाच मोहित करत आहे. शहरापासून ३२ कि.मी. अंतरावर असणार्‍या खोपी गावापासून हा घाट सुरू होतो. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button