खराब रस्त्यांचा फटका शालेय विद्यार्थ्यांना नको, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेले शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बस वाहतुकीवर पूर्णपणे अवलंबून असतात, अशावेळी हे सर्व रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पुढाकार घेतला असून वाहतुकीसाठी खराब रस्त्यांची माहिती रत्नागिरी एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे मागवली आहे.असे कोणते रस्ते आहेत जे शालेय विद्यार्थी बस वाहतुकीकरिता सुस्थितीत आहेत, कोणते रस्ते नादुरूस्त असल्याने वाहतूक बंद होवू शकेल, याची माहिती मागवली आहे. रस्ते बंद होवू नयेत म्हणून भाजप यामध्ये सहकार्य करू शकतो. त्यासाठी सर्व खराब रस्त्यांची माहिती आम्हाला द्या, अशी मागणी जिल्हाध्य राजेश सावंत यांनी केली आहे.www.konkantoday.com