कुवारबांवमधील घनकचरा प्रकल्पासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार
कुवारबाव परिसरातील घनकचरा प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेली १५ महिने खितपत पडलेल्या संबंधित जागेच्या सातबार्यावर गायरान ही नोंद असल्याने आता जिल्हा प्रशासन यावर कोणता तोडगा काढणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.www.konkantoday.com