
कालच्या प्रकाराबाबत दोषी व्यक्तींवर तात्काळ कारवाई करा पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला आदेश
रत्नागिरी शहरात काल एमआयडीसी परिसरात वासराचे मुंडके कापून रस्त्यावर टाकण्याचा झालेला प्रकाराबाबत रत्नागिरीत निषेध व्यक्त होत असतानाच आता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकाराचा कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे त्यानी प्रसार माध्यमांना दिलेल्या व्हिडीओत काल झालेल्या संपूर्ण प्रकाराचा निषेध करत, झाला प्रकार निंदनिय असल्याचे म्हटले आहे. ज्या माणसाने हा प्रकार केला आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देश पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिल्याचे त्यांनी म्हटले आहेत. समाज कंटक कोठे जरी लपलेला असेल त्याला शोधून काढा, अशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कारस्थान ज्या कोणी केले आहे त्याला पकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यानी दिले आहेत