
सतरा महिन्यांपासून महाविरणची वीज चोरी
सतरा महिन्यांपासून चोरीची वीज वापरून महाविरण कंपनीचे ८.५६ लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी चिपळूण तालुक्यातील तनाळी येथील रमेश कृष्णाजी वैद्य व सहदेव विष्णू चव्हाण (दोघे तनाळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी चिपळूण पोलीस स्थानकात घडली. ही घटना तनाळी येथे घडली आहे.याबाबतची फिर्याद विजय राजेश धरमसारे (३१, उप कार्यकारी अभियंता, भरारी पथक, पेण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश वैद्य व सहदेव चव्हाण यांनी अनधिकृतपणे रमेश वैद्य व सहदेव चव्हाण यांनी अनधिकृतपणे २३ नोव्हेंबर २०२२ ते २३ एप्रिल २०२४ या १७ महिन्यांच्याा कालावधीत ४७९६२ युनिट वीज चोरून वापरली. यातून ८ लाख ५६ हजार ३६० रुपयांची वीज चोरी करून महावितरण कंपनीचे नुकसान केले आहे. या प्रकरणी विजय धरमसारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैद्य व चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com