दापोली तालुक्यातील केळशी येथे गांजा सेवन करणारी मुले आढळली
दापोली तालुक्यातील केळशी येथे आढळून आलेल्या चरस आणि गांजा सेवन करणार्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असणारे चिलीम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील तिघांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. संशयित मुख्य सूत्रधार फरारी झाला होता. मात्र त्याला दुसर्या दिवशी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.www.konkantoday.com