उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त १२ वा उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवल्याने राज्यात विधान परिषदेची निवडणुक अत्यंत चुरशीची
उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त १२ वा उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवल्याने राज्यात विधान परिषदेची निवडणुक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे पाच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे दोन तर कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.परंतु उद्धव ठाकरे गटाकडून काल मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता या निवडणुकीत क्रास व्होटिंगमुळे कुणाचा गेम होणार ? याची चर्चा सुरू झाली आहे. कारण मागच्या विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना क्रास व्होटिंग फटका बसला होता. त्यामुळे या निवडणुकीत आता सगळ्याच उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.विधान परिषदेतील ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यासाठी येत्या १२ जूलैला निवडणुकीत होत आहे.www.konkantoday.com