भिंगळोली येथील तहसील कार्यालय इमारतीच्या छताला मोठी गळती
आपत्ती काळात जीवाचे रान करून मंडणगड तालुक्यातील जनतेची मदत करणार्या भिंगळोली येथील तहसील कार्यालय इमारतीच्या छताला मोठी गळती लागली आहे. त्यावर तात्पुरत्या स्वरूपातील टाकण्यात आलेला प्लास्टीक कागदही पावसाने उडून गेल्याने गळतीचे पाणी कार्यालयाचे कॉरिडॉरमध्ये पसरते. मंडणगड तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन बांधकामाचा प्रभाव असलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी या इमारतीच्या छताची डागडुजी करत असे. त्यामुळे निर्मितीच्या ६४ वर्षानंतरही इमारत अजूनही भक्कम आहे. मात्र कोरोना नंतर इमारतीचे देखभाल दुरूस्तीकडे बांधकाम विभागाने लक्ष दिलेले नाही. www.konkantoday.com