चिपळूण शहरातील नदीतील मगर रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल
चिपळूण शहरात गेल्या तीन चार दिवसांत शिव नदी, पेटमाप आदी नदी किनाऱ्याच्या भागात मगरी थेट रस्त्यावरून संचार करताना आढळून येत आहेत. मगरीचा फेरफटका मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक वेळा वन विभागाचे अधिकारी या मगरींना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतात. अशा घटना चिपळूण परिसरात सातत्याने घडत असून, उन्हाळ्याच्या दिवसात मात्र याच मगरी पर्यटकांचे आकर्षण ठरतात. शहरातील गोळकोट बंदर येथे उन्हाळ्याच्या दिवसात क्रोकोडाइल सफारीसाठी पर्यटक देखील येत असतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात याच मगरी जेंव्हा रहदारीच्या ठिकाणी भर रस्त्यावरून फिरू लागतात तेंव्हा नागरिकांची भंबेरी उडते. अशा प्रकारे रात्री मगरी रस्त्यावरून अन्नाच्या शोधात फिरू लागल्याने पादचारी नागरिक आणि वाहनधारकांसाठी धोक्याचे ठरू लागले आहे.www.konkantoday.com