घाटमाथ्यावर पावसाचा रत्नागिरीकरांना फटका, भाज्यांचे दर कडाडले
रत्नागिरी जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दहा ते वीस रुपये किलोने विकल्या जाणार्या टोमॅटोचे किलोचे दर ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हिरवी मिरची दीडशे रुपये किलो झाली आहे. भाजीवाल्यांचे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घाटमाथ्यावरून भाजीपाल्याची आवक होते. मात्र गेल्या आठवडाभर घाटमाथा तसेच कोकण विभागात जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीच्या दरात वाढ होवून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.www.konkantoday.com