सिया म्हाब्दी आत्महत्येप्रकरणी पती, सासरा, दिरास दोन दिवसांची पोलीस कोठडी
दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे सिया म्हाब्दी हिला मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज म्हाब्दी, सासरा संजय म्हाब्दी, दीर आकाश म्हाब्दी यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दापोलीतील गव्हे येथे राहणारी सिया म्हाब्दी (२७) हिने शुक्रवारी दोन वर्षाचा मुलगा समर याला घेवून घराशेजारी असणार्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सिया हिचा भाऊ विनोद गुरव (रा. आसूद) याने आपल्या बहिणीला वेळोवेळी मानसिक त्रास देवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले गेल्याची फिर्याद शनिवारी दापोली ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले.www.konkantoday.com