राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी विराजमान; सुजाता सौनिक यांची नियुक्ती
मुंबई- राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी असतील. डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ आज संपला. सेवा ज्येष्ठतेनुसार सौनिक यांची वर्णी लागली आहे. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सुजाता यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून धुरा सांभाळलेली आहे. सुजाता सौनिक या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. जून २०२५ मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. नितीन करीर यांच्याकडून त्या पदभार स्वीकारणार आहेत. सुजाता सौनिक या वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक या वरिष्ठ होत्या. यानंतर राजेश कुमार (1988) व इक्बालसिंह चहल (1989) हे दावेदार होते. सुजाता यांची नियुक्ती झाल्याने पती-पत्नी असे दोघेही मुख्य सचिव पदावर काम करण्याची पहिलीच वेळ आहे.