कुडाळ आगारातून १२ वाजल्यानंतर एकही गाडी धावली नाही
कुडाळ एसटी आगारात आज, १ जुलै पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. हे वेळापत्रक चुकीचे असून मनमानी पद्धतीने तयार केले असल्याचा आरोप एसटी वाहक आणि चालकांनी केला आहे.या मनमानी कारभाराविरोधात आज दुपारी १२ वाजल्यापासून चालक आणि वाहकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे कुडाळ आगारातून १२ वाजल्यानंतर एकही गाडी धावली नाही. त्यामुळे कुडाळला कामानिमित्त आलेले प्रवाशी, विद्यार्थी यांनी हाल झाले.अखेर कर्मचारी, युनियन प्रतिनिधी आणि डेपो मॅनेजर यांच्यात चर्चा होऊन जुन्या वेळापत्रकातील त्रुटी काढून ते लागू करण्यावर एकमत झाल्याने सायंकाळी ४ वाजता गाड्या सुरु झाल्या.www.konkantoday.com