शीळ पाईपलाईन दिरंगाईप्रकरणी कंत्राटदारावर होणार दंडात्मक कारवाई
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातून जॅकवेलपर्यंत पाईप जोडणी करण्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीने १३ मेपर्यंत काम पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु कामात दिरंगाई व हलगर्जीपणा दाखवला गेला म्हणून या सदर ठेकेदार कंपनीविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे रत्नागिरी नगर परिषदेने ठरवले आहे.प्रशाासकीय सूत्रांनी सांगितले की, सदर ठेकेदार कंपनीला १४ मार्चला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. यात शीळ धरणातून जॅकवेलपर्यंतची पाईप जोडणी पूर्ण करण्याचे काम समाविष्ठ होते. हे काम १३ मे पर्यंत पूर्ण करावे, असे सूचित करण्यात आले होते. परंतु हे काम वेळेत पूर्ण केले नाही, कामात दिरंगाई झाली. हलगर्जीपणा दाखवला गेला असा आरोप ठेवून सदर ठेकेदार कंपनीविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे. धरणातून जॅकवेलपर्यंतचे पाईप ऐन पावसाळ्यात बसवल्याने ते निसटून गेले आणि नदीच्या दुसर्या काठापर्यंत त्यातले काही भाग गेले. ते एकत्र करुन पुन्हा बसवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. यामध्ये नगर परिषद एकही रूपया खर्च करणार नाही. पावसाळ्यानंतर हे काम कंत्राटदार सुरू करेल आणि महिनाभरात ते पूर्ण होईल, असेही अधिकार्यांनी सांगितले.www.konkantoday.com