दापोलीत भाजप व रामदास कदम यांच्यात वाद पेटला
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजप नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी समाचार घेतला आहे.रामदासभाई तोंड सांभाळून बोला आमच्या नेत्यांसोबत केलेली आक्षेपार्ह विधान आम्ही खपवून घेणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ ही तुमची एकट्याची जहागिरी नाही सगळीकडे फक्त मीच असा विषय काही चालणार नाही असा संतप्त इशाराच भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी थेट दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष संजय सावंत, मकरंद म्हादलेकर, भाऊ ईदाते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुलाखती देताना रामदास कदम हे भाजपा नेत्यांवरती सातत्याने आक्षेपार्ह विधान करत आहेत असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात दिलेल्या विकास कामाच्या निधीबाबत रामदास कदम टीका करत आहेत. रामदास कदम आम्हाला सातत्याने स्थानिक आमदाराचा हक्कभंग होत असल्याचे सांगत आहेत. मात्र हणैॅ येथील केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून बंदराला मिळालेल्या मंजूर विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही घेतलं नाही त्यांचा फोटोही लावला नाहीत त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही फोटो लावला नाहीत मग हा हक्कभंग होत नाहीका ? असा खडा सवाल केदार साठे यांनी उपस्थित केला.