मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेत क्रेनच्या धडकेने वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे क्रेनने सायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्ययू झाला. या घटनेची नोंद मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील पोलिसांत करण्यात आली.रामचंद्र विठ्ठल जाधव (६७, रा. असगणी-समर्थनगर) असे या वृद्धाचे नाव आहे. ते सायकलने किराणा मालाचे सामान आणण्यासाठी लोटेतील खेडेकर यांच्या किराणा दुकानात गेले होते. तेथून सायकलने लोटे येथे वडापाव टपरीजवळ आले. मात्र टपरी बंद असल्याचे निदर्शनास येताच ते परत असगणी येथे सायकलने जात होते. या दरम्यान एस. आर. फाटा येथे हायड्रा क्रेनने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. या बाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाने येथील पोलीस स्थानकात कळवल्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.www.konkantoday.com