दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करणार्या तरूणाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू
कोकण मार्गावरून धावणार्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करणार्या तरूणाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास महाड तालुक्यातील वाजेवाडीनजिक घडली.संकेत पांडुरंग गोठल (२०, रा. भडगाव-मधलीवाडी, खेड) असे मृत तरूणाचे नाव आहे. संकेत गोठल हा दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून खेडला येत होता. दरवाजात उभा असताना अचानक त्याचा तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार दाभाडे आदींसह महाशक्ती रूग्णवाहिकेचे अनिल चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचले. www.konkantoday.com