पोस्ट पेड मीटर व जोडणी पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी, पुरोगामी संघटनांची मागणी
महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांकडून लादण्यात येणार्या स्मार्ट प्रीपेड वीज मीटरला चिपळुणातून कडाडून विरोध होत आहे. यासंदर्भात प्रागतिक पक्ष व विविध पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांना निवेदन देत पोस्ट पेड मीटर व जोडणी पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.महावितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसविणार असे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे.www.konkantoday.com